५०९. आत्मसमर्पण

मराठी

५०९. आत्मसमर्पण जे जे मनीं आले, मुखें उच्चारिलें, हातांनी जे केले आज, बापा ... १ ते तें अर्पितों मी तुजलागिं, देवा, स्वीकार करावा ह्याचा प्रेमे ... २ मीपण हें माझें तुझेंच जाहालें, चरणीं वाहिले सारें जिणें ... ३ दास म्हणे, झालों पुरताच तुझा, आतां भार माझा कोण वाही ... ४ ---- ना. वा. टिळक