आत्मसमर्पण

मराठी

५१२ आत्मसमर्पण करोनि स्नानातें विमल अनुतापार्नवजली जयाने पापाची घनतर पुटें सर्व हरली तुझी पूजा, ख्रिस्ता, करिन ,म्हणतो, घे करोनियां, करी सारें लोकीं लघु नर न, देवा, तव दया ... १ दयाळा, विश्वाला सृजिशी, तुजला आसन कसें कुठें द्यावें घे घे मम मन परी मानून तसें पहा हे भक्तीच्या नयनीं अतिरेकीं जल रिघे, जगतत्रात्त्या, ह्यातें समजून, विभो अर्ध्यजल घे ... २ पहा हा स्नेहाचा मम मनी कसा ओघ उठला, प्रभो, ये अभ्यंगा कर, अजि करी धन्य मजला वहातों हर्षाश्रु मम तुजशी शुद्धोदक वरीं, दयाळा, ये घे रे प्रणत अनुगिं वत्सल तरी ... ३ उगाळितों आतां, प्रभू मम मनश्रनदन बरा, विवेकीं पाषाणीं पतितजनतातारणपरा समाकर्षी ऐसा परिमल जगिं नाही दुसरा, बघोनी मत्प्रेमा म्हणशील मनीं तूं प्रभूवरा ... ४ ---- ना. वा. टिळक