५१३. भीती न बाळगणे

मराठी

५१३. भीती न बाळगणे भय भय भय भय म्हणशी, सांग रे कशाचें जय जय जय जय तुझिया कां न येइ वाचे ...ध्रु देशबंधू तव मरती खेद न तव चित्ती, नित्य तुझी मग्न वृत्ती रक्षणी तनुचे ... १ भारतभूमी म्हणते, चल, तूंच खरें माझे बल, व्यर्थ दुजे पुत्र सकल एक शब्द तिचे ... २ थांब थांब का पळशीं येईं पुढे का लपशी ख्रिस्तशिष्य म्हणविशी भान धरीं याचें ... ३ टाळूनियां जनसेवा रक्षितोस निजजीवा, बुडविणें गुरुनावां पाप घोर साचें ... ४ अस्त न ज्या नित्य उदय ख्रिस्त उभा मृत्युंजय, तोंवर तूं जगिं निर्भय साह्य घेई त्याचें ... ५ -- ना. वा. टिळक