५१५. जनसेवा हि जीविताची सार्थकता

मराठी

५१५. जनसेवा हि जीविताची सार्थकता जन्मा येऊनि त्या जगण्याचें सार्थक करणे जरी असलें जनसेवेस्तव जगणें मरणें ध्येय करा तर मग अपुलें ... १ कुसुम म्हणेना, परिमल अपुला कां द्यावा मी अन्य जना का द्यावी मधुरता आपुली इक्षु म्हणेना, इतरांना ... २ निजदेहातें झिजवून चंदन, निजगंधां दे सकलातें, वृक्ष दक्ष हा द्याया आश्रय ये छायेस्तव जें त्यातें ... ३ सेवा घ्यावी म्हणून नाही आलो सेवाया इतरां, श्रीख्रिस्ताची वाणी शुभमय पदोपदी हि स्मरा, स्मरा ... ४ मी मी मी मी याच पिशाचें सदैव मनुजाला पिळीलें, गिळिलें गिळिलें गिळिलें त्याचें मनुष्यपण अवघें गिळिलें ... ५ जनसेवा हि ईश्वरसेवा, तत्व निरंतर मणी धरा, ईश्वर म्हणजे प्रेम, वाक्य जे पढलां तें जगी खरें करा ... ६ ------- शा. रा. आढाव