५१६. निष्काम सेवा

मराठी

५१६. निष्काम सेवा करुनि सुहास्य आम्हां हासविते, काय हो इच्छिते उषा मान ... १ मंजुळ मंजुळ पक्षीराय गाती, काय व्हावी कीर्ती इच्छितात ...२ फुलें दर्शनानें आम्हां रंजविती, काय ती मागतीं मानपत्रें ... ३ काय जगताला भजनीं लावाया येतसे उदया भानू व्योमीं ... ४ दास म्हणे, सेवा सर्वांची निष्काम, मीच कां सकाम करावी ती ... ५ ---- ना. वा. टिळक