५१७. प्रभूसेवा

मराठी

५१७. प्रभूसेवा हि खरी प्रभूसेवा जनसेवा, मान्य खरोखर देवा ... ध्रु चित्ती प्रभूला धरणें प्रभूला आवडतें आचरणें ... १ अपुलें हित विस्मरणें परहित केवळ अपुलें गणनें ... २ मी कोणी नच म्हणणें, प्रभूला गौरव अवघे देणें ... ३ शुभवृत्ता गाजविणे, अवघें जीवित त्यांतच सरणें ... ४ ---- ना. वा. टिळक