५१८. सेवालाभ

मराठी

५१८. सेवालाभ हे प्रभू, तव सेवा घडो सदा जनीं ... ध्रु संसारभीतरीं प्रेमा तुझ्यावारीं वाढो घडो बहू तव चाकरी ... १ कल्याणकारिणी हि सौख्यदायीनी, लागो जीवित तिचे साधनी ... २ मिथ्या जगत्सुखें, सत्ससौख्यकामूके मीं घ्यावीं कां क्षणिक भातुकें ... ३ सेवा परीस हा, जीवित लोह या स्पर्शी सुवर्ण मोल यो तया ... ४ ख्रिस्ता, मदतरीं वस्ती सदा करीं, स्वेच्छेनुरूप दास वापरीं ... ५ ---- वि. का. कोशे