मराठी
५२०. सद्भक्ताचीं लक्षणें
सेवक विश्वासनीय असावा,
शांत , सिद्ध, परी शुद्ध असावा,
सेवक विश्वासनीय असावा ... ध्रु
स्वार्यपरायण, मंद नसावा,
चंचल, दुर्बल, भीरु नसावा ... १
निजकार्यी रत हाच असावा,
हर्ष तयाचा, हाच विसावा ... २
टाकील ओवाळून जो अपुल्या
प्रिय सोन्याच्यावरुनी जिवा ... ३
सेवक असले तव दरबारी
तुझ्या कृपेनें वसोत, देवा ... ४
-------------- ना. वा. टिळक