मराठी
५२१. ख्रिस्तदास
प्रभूसेवाक हे अभिधान,
बा प्रभूसेवक हे अभिधान,
गमे प्रियकर हितकर मंगल नाम ... ध्रु
अनुरूप नांवाप्रती या करणी
राखुनी झटतां सार्थक जाण,
ख्रिस्तधनी ते यत्न विलोकूनि
दे प्रसाद मोलवान,
भरपूर पुरवी कृपेचें दान ... १
उद्योगिं रत नित्य राहतां,
मंगलदायी सुवर्तमान
ख्रिस्तदयेचें जगिं गाजवितां,
कार्य साधू या महान,
त्यांत घडे बहुजनकल्याण ... २
हे जगदीशा, भक्तजनांप्रती
तव सेवेस्तव दे बल ज्ञान,
तूं तव इच्छा तव संतृप्ती
हेंच होऊं आत्मध्यान,
त्यांतचि होवो जीव रममाण ... ३
---- वि. का. कोशे