मराठी
५२३ स्वार्पणाची प्रार्थना
हेंचि दान, दे गा देवा,
नित्य घडो तुझी सेवा ... १
तुझ्याप्रीत्यर्थ विचार,
घडो आचार उच्चार ... २
तुझी इच्छा तीच माझी,
सदा असू दे देवाजी ... ३
तुझें चिंतन जीवन,
मृत्यू तुझें विस्मरण ... ४
तुझें लेंकरूं मी देवा,
घेई बापासम सेवा ... ५
-------------- ना. वा. टिळक