मराठी
५२४. प्रभुपदछंद
त्वत्पदछंद निरंतर राहो,
प्रेम मनांतुनी वाहो ... ध्रु
तव इच्छा ती माझी व्हावी,
हेंच मनाला भावो ... १
निंदो वंदो कोणी मन हें
प्रेमभरें ते साहो ... २
दो दिवसांची यात्रा येथील,
दिव्यपदी मन राहो ... ३
प्रेम तुझ्यावर, प्रेम जगावर,
हाच म्हणो मन लाहो ... ४
तव वचनीं रती संतत राहो,
मन येशूचें होवो ... ५
सुचोत न मला हजार नांवें,
मन बापा तुज बाहो ... ६
-------------- ना. वा. टिळक