मराठी
५२५. ख्रिस्तदासाची अपात्रता
हें मम्मीत्र, मी पात्र नाही तुझ्या रे प्रेम,
परी मी तुला आवडे ... ध्रु
माझ्यामुळें निचसेवाविधान,
माझ्यामुळें दैन्य दुखापमान,
प्राणावरी ये तुझ्या साकडें
हें मम्मीत्र, मी पात्र नाही तुझ्या रे प्रेम,
परी मी तुला आवडे
मी दीन, धीहीन, पापाशयाधीन,
देहापुढें लिन, मी प्रभो
स्वीकारिलें तुन अश्या पामराला,
तूं तारिलें ह्या जढा प्रस्तराला
सांभाळा आतां, प्रभो, यापुढें ... १
-------------- ना. वा. टिळक