मराठी
५२६ आत्मनिवेदन
सर्व ख्रिस्तासाठीं काहीं,
सर्व शक्तीं, जीव, प्राण,
शब्द, कामें कल्पनाहि,
सर्व दीन, तास, जाण ... १
येशू ख्रिस्ता सर्व कांही
अर्पि, सारें जिणें जाण ... ध्रु
हात हेहि त्याचे कार्या,
पाय मार्गी चालाया,
नेत्र माझे त्या पहाया,
ओठं स्तुती गावया ... २
रत्न, तेजस्वी पदार्थ,
कीर्ती, द्रव्य, सुखें यांस
थोर मानी जग अर्थ,
ख्रिस्त परी माझी आस ... ३
ख्रिस्त प्रेमें न्याहाळितां
अन्य सारें वाटे वीट,
चित्त त्याशी जडे आतां
ख्रिस्त खांबी देता दीठ ... ४
ख्रिस्त राजा गौरवी हा
प्रिया मला मानितो,
केवढें आश्चर्य पाहा
नित्य माझा थारा तो ... ५
---- हेफसिबा पि. ब्रूस