मराठी
५२७. ख्रिस्तसेवेसाठीं जिवंत राहणें
प्रभू तुझाचि अधिकार
मी आनंदाने मानितों
तुझे स्मरुनी उपकार
तुलाच प्राण अर्पितों ... १
तूं , सोडीशीं, करू मी काय
मला दिलासी तू आधार
तुझे धरीन नित्य पाय,
तुला मी नाही सोडणार ... २
तुझ्या सेवेस मी लागेन,
करिन मी तुझ्या कामा,
मी तुजसाठीं बा जगेन,
स्तवीन तुझिया नामा ... १
संपादण्या, प्रभो, धना,
सुखोपभोग मनस्वी
न घालवीन मी क्षणा,
न लागे मोठी पदवीं ... ४
सेवा तुझीच आवडे
तू देशीं आपुल्या प्राणा,
मी राहुनी तुझ्याकड़े
अनंत पावें कल्याण ... ५
तुझी स्तवीन सत्यता,
गाईन प्रेम टे अपार
तुझ्या उराशीं मरतां
हर्षें करिन जयकार ... ६
--------- एच . बॅलेंटाईन