५२८. देवाला सर्वस्व अर्पिणे

मराठी

५२८. देवाला सर्वस्व अर्पिणे देवाचे सर्व उपकार फेडाया करूं काय सदैव स्तवुनी तया धरीन त्याचे पाय, देवाच्या भक्तांसंगतीं भजेन त्यासमोर, वर्णीन सकलांप्रती देवाची कृपा थोर ... १ प्रभू देवा तुला प्रीती किती आवडती सद्भक्त तुझ्या दृष्टीला सुप्रिय दिसती उद्धार माझा तू केला, मी स्तोत्रें अर्पितों तूं जीव माझा राखीला, तुला तो वाहतों ... २ तुझा मी आतां झालों जाण निर्धार जाहला, मला तू दिला हर्ष थोर, जीवात्मा तारीला, भक्तांनो, ऐका हा निश्चय, मी नाहीं फिरणार, धरीं मी देवाचा आश्रय, कधीं न सोडणार ... ३ --------- एच . बॅलेंटाईन