५३०. वधस्तंभ उचलून चालणें

मराठी

५३०. वधस्तंभ उचलून चालणें येशू , वधस्तंभ घेतों, तुज अनुसरणार, टाकुनी जगास देतों, आस तुझी लागे फार, हो, असो हे जग वैरी, तुज त्यानें द्वेषिलें, तूंच माझा हो कैवारी या जगाने भोंदिलें ... १ दुःख येवो, क्लेश निंदा, द्रव्य जळो अवघें, हर्ष तुझ्यापाशीं सदा, अन्य सौख्य नलगे, रक्त तुझें पाहतांना धैर्य नाहीं खुंटणार, तुझें मुख लोपतांना शांती नाहीं वाटणार ... २ --------- एच . बॅलेंटाईन