मराठी
५३१. ख्रिस्तप्रेमवृद्धी
ख्रिस्ता, तुझ्यावरी
प्रेम वाढो,
माझें तुझ्यावरी
प्रेम वाढो
पायां मी पडतों
अजिहीं करितों,
तुजवरी प्रेम वाढो ... १
लौकिक मी सुखी
दंग मागें,
आतां तुझ्या सुखीं
दृष्टी लागे
धावा मी करितों
आग्रह धरितो,
तुजवरी प्रेम वाढो ... २
पारखितां मना
दुःख होवो,
ज्वालाही लागतां
हिण जावो
अग्नीत पोळतां
मी म्हणे सर्वथा,
तुजवरी प्रेम वाढो ... ३
हा प्राण सोडितां
तुला स्तवीन
मी स्वर्गी चढतां
हें विनवीन
हि माझी प्रार्थना,
ख्रिस्ता मज्जीवना,
तुजवरी प्रेम वाढो ... ४
----- हेफसिबा पी. ब्रूस