५३२. प्रभूसेवा करण्याचा हेतू

मराठी

५३२. प्रभूसेवा करण्याचा हेतू तुझी करावी सेवा सदा माझा हेतू , स्वामी, सन्मित्रा, देवा, राहीं सान्नीध्यिं तु तूं माझिया सान्नीध्यिं न मी युद्धा भीतों, नेणारा तूं रक्षुनी मार्गभ्रांति न तो ... १ तूं नित्य माझ्यापाशीं मला वाटे ऐसें हे सारे दुजें राहीं माझ्या ठायीं जसें संमोहिती देखावे किती हे नेत्रांना ह्या शब्दांनी मांडिली कर्णांची वंचना ... २ हे अंतरी बाहेरी उभे माझे वैरी, त्राणा माझ्या, येई रे, संरक्षी, सांवरी आश्वासिलें तु त्यातें तुझ्या झालेल्यातें कीं मी सुस्थानीं जेथें माझे तेहि तेथें ... ३ जिवंत आहे तों मी करावें सेवेला, सिद्धीला जावो हेतु , देणारा तूं बला मित्रा, गुरो, दातारा, प्रभो, ख्रिस्ता स्वामी हे राजा हे आधारा स्थिरावी नेहमी ... ४ ---- ना. वा. टिळक