मराठी
५३३. आत्मसमर्पण
तूं बोलाविलें सेवा कराया
प्रभूं आलो आनंदे,
तरी विश्वासें तुजजवळी
मज नित्य राहूं दे ... १
मज जोडी, प्रभू तुजशीं
तव, क्रुसा दावोनी,
मज घेई तव कुशीशीं
प्रभू, घेई ओढोनि ... ध्रु
तव सेवेला क्षम व्हावेंसें
करीं, ख्रिस्ता कृपेनें,
तव इच्छेला वंश सर्वदा,
स्थिर व्हावें आशेनें ... २
क्षणभरींहि तुजजवळी
किती शांती मनाशीं
किती मागणी प्रितिमापणें
जशी मित्र मित्राशीं ... ३
तरी संपत्ती तव प्रीतीची
इहलोकी कळेना
भरती तैशी सदानंदाची
न मिळे स्वर्गाविना ... ४
----- एस. बी. फेरबँक