५३४. अनुग्रहांचा वर्षाव

मराठी

५३४. अनुग्रहांचा वर्षाव होईल वृष्टी कृपेची, ईशप्रेमोक्ती असे, तेणें तुष्टी पुष्टी यांची वृष्टी जगिं होतसे ... १ वृष्टी कृपेची वृष्टी कृपेची हवी बिंदू येताति दयेची आम्हा सुवृष्टी हवी ... ध्रु होईल वृष्टी कृपेची, स्फुर्तीदायी, थोर ती ये झोड भारी वारीची, खिंड्याटेकाडांत ती ... २ होईल वृष्टी कृपेची, देवा, करावी आतां स्वोक्ती करा, स्वामी, साची, द्या हर्ष अपेक्षितां ... ३ होईल वृष्टी कृपेची, साधा प्रभू इष्ट काज, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नांवें करीतसुं आज ... ४ ----- वि. का. कोशे