५३५. परोपकार करणारांस प्रतिफळ

मराठी

५३५. परोपकार करणारांस प्रतिफळ एक प्रवासी दीन फार मला आढळे वारंवार, तो साह्य मागे मजला, नाहीं म्हणवेना मला, नाहीं पुसलें त्याचे नांव, कीं भाऊबंद, देश, गांव, पाहुनी चर्या सत्वरीं प्रीती उपजे अंतरीं ... १ मी अन्न खातां, दुबळा तो आला, उभा राहिला मी सव त्याला दिलें दान तो देवा स्तवी, घेई अन्न कांही, घेऊनि मजला शेष माघार दीधला, तें खातां गोड वाटे फार, दूतांच्यासारिखा आहार ... २ मी पुढें झरा पहिला तेथें तो दिसे मजला तें पाणी हाथी लागेना, ती तान्ह त्याला साहेना, मी आलो वाढी भरिली, तो पीतां शक्ती भरली तैं मला वाढी भरुनी दिधलें पाणी जीवनी ... ३ तो पुढें बंदी पडला अन्यायें दंडी ठरला मी त्याचा पक्ष धरितां दाविली त्याची सत्यता तो म्हणे तूं मजसाठी देसी प्राण रोमांच उभे राहिले, परी मी होय म्हटलें ... ४ त्या वेळी तो प्रकटला, हा ख्रिस्त मी ओळखीला, हातांत खिळे रोविले हे व्रण दृष्टी पडले तो म्हणे, नांव घेऊनि, मी जाणे तुझी करणीं, तू जे जे केले उपकार तें नाही मी विसरणार ... ५ --------- एच . बॅलेंटाईन