मराठी
५३६. येशूचा दरबार
येशूचा दरबार धन्य हो
येशूचा दरबार ... ध्रु
जेष्ठकनिष्ठांवरी सारखा
एकाचा अधिकार निरंतर ... १
एक शरीरीं एकच आत्मा
करी आनंदविहार निरंतर ... २
एक पुरे अधिकार असावा
अन्योनी सहकार निरंतर ... ३
ह्याच उपवनीं प्रीतीलतेला
नटवी फळसंभार निरंतर ... ४
---- ना. वा. टिळक