५३७. ख्रिस्तसैनिकांनी करावयाची चढाई

मराठी

५३७. ख्रिस्तसैनिकांनी करावयाची चढाई हा चालला ख्रिस्त, या, सैनिकांनो, चला, व्हा पुढे, वेळ लावूं नका घ्या आपले खांब खांद्यावरी घ्या, लढाईच हो, खेळ नाहीं फुका . हे मोह, हें पाप, हें दुःख मृत्यू असे शूर हें सदू आले पुढें . झुंजा चला सर्व चिंता त्यजा हो, पहा त्याकडे सैन्यनायाकडे ... १ हा चालला ख्रिस्त, या सैनिकांनो, चला, व्हा पुढें वेळ लावूं नका फेकून द्या स्वार्थयुद्धि, कशाला हवी शृंखला हि महाघातुका इच्छा प्रभूची, अनुज्ञा प्रसूची पुरे, हि जया देई शंका नको . प्रार्था तयाला, म्हणा हें प्रभो कीं मनीं क्लेश हिचा न माझ्या टिको ... २ हा चालला ख्रिस्त या सैनिकांनो चला व्हा पुढें वेळ लावू नका का थांबतां स्वर्गपृथ्वीस येशू किती हा प्रतापी पुरा ठाउका पापात्मसैन्यास झोडा, बघू यां खरी हि खरी हीच सेवा खरी देवा, तुझें राज्य विश्वांत साऱ्या प्रतिज्ञेत द्या रंगु ह्या वैखरी ... ३ ---- ना. वा. टिळक