मराठी
५३८. प्रभूकार्य पुढें चालविणें
हात पाय हालवा ,
प्रभूचें कार्य पुढें चालवा ... ध्रु
शरीर आपण त्या शिर्षाचें
नित्य मणी वागवा
प्रभूचें कार्य पुढें चालवा ... १
प्रभू सेनानी, चला पुढें व्हा
चला करा आहवा
चला करा आहवा
प्रभूचे कार्य पुढें चालवा ... २
पापात्म्याची मोडा सत्ता,
ख्रिस्तीपण गाजवा,
ख्रिस्तीपण गाजवा,
प्रभूचे कार्य पुढें चालवा ... ३
प्रभूसंस्थापित देवाजीचें
राज्य जागी वाढवा
राज्य जागी वाढवा
प्रभूचें कार्य पुढे चालवा ... ४
पावित्र्याचा, शांतीमुक्तीचा
मार्ग जगा दाखवा
मार्ग जगा दाखवा
प्रभूचें कार्य पुढे चालवा ... ५
---- ना. वा. टिळक