५३९. निरंतर यत्न करणे

मराठी

५३९. निरंतर यत्न करणे करा पराक्रम नवा निरंतर यत्न पुढे चालवा ... ध्रु प्रभू सेनानी, विजयाविषयी धरूं नका वानवा धरूं नका वानवा निरंतर यत्न पुढे चालवा ... १ बघा क्रुसाची ध्वजा पुढें हो, करा करा उत्सवा करा करा उत्सवा निरंतर यत्न पुढे चालवा ... २ म्हणा प्रभो, घे तुझ्या हवाली केलें अपुल्या जिवा केलें अपुल्या जिवा निरंतर यत्न पुढे चालवा ... ३ दया नको, परी पतितांविषयी प्रेम मनीं वागवा प्रेम मनीं वागवा निरंतर यत्न पुढे चालवा ... ४ नव्या दमाचे नवे शिपाई, मिळवा बघू वाहवा मिळवा बघू वाहवा निरंतर यत्न पुढे चालवा ... ५ हिंदभूमीचे ऋण फेडाया खराच हिंदी हवा खराच हिंदी हवा निरंतर यत्न पुढे चालवा ... ६ ---- ना. वा. टिळक