५४१. देवराज्याप्रित्यर्थ प्रार्थना

मराठी

५४१. देवराज्याप्रित्यर्थ प्रार्थना देवा, तुझे राज्य मनीं जनीं वनीं पाहीन नयनी कधीं बापा ... १ कधीं बापा, तूंतें जग ओळखील आधीन होईल कधीं तुझ्या ... २ पवित्रपणाची ध्वजा उभारेल, कधीं रे करील सत्ता प्रेम ... ३ येथूनि तेथुनि कलह कल्लोळ कधीं हा टळेल जगांतला ... ४ विजयाचा हर्ष, शांतीचा विसावा पावे कधीं देवा ख्रिस्तसेना ... ५ दास म्हणे, झालें तुझें राज्य तरी अंगण ओसरी स्वर्ग पृथ्वी ... ६ ---- ना. वा. टिळक