मराठी
५४२. सुखशांतीपूर्ण देवराज्य
राज्य देवाजीचे प्रेमपावित्र्याचें,
दुरितदुखाचें निर्मूलन ... १
राज्य देवाजीचें सुखाचे शांतीचे,
कालमहिम्याचें उत्पाटन ... २
राज्य देवाजीचें अखंड जयाचें,
संदेहभयाचे विनाशन ... ३
राज्य देवाजीचें सदा स्वातंत्र्याचें,
दु:सह दास्याचें उच्चाटन ... ४
दास म्हणे, आम्ही नांव धरूं दास,
तोषवू बापास पुत्र जैसे ... ५
---- ना. वा. टिळक