मराठी
५४३. ख्रिस्ती सैनिकांस प्रोत्साहन
ख्रिस्ती बांधवांनो, सुवार्ता गाजवा,
तारण कलवा सर्व जना ... १
नाम येशू ख्रिस्त सांगा सर्व लोकां,
कळवा त्यां भाका तारणाच्या ... २
येऊनि करुणा हिंदी बांधवांची,
वदा जोष्ट साची त्यां खांबाची ... ३
सहाय तुम्हांला मुक्तीच्या सेनेची
टोळी ती संतांची आहे पुढें ... ४
तर आतां उठा करुनि निश्चय,
धरूं नका भय कोनाचेहीं ... ५
---- बा. ल. साळवी