५४४. ख्रिस्ताची सेना

मराठी

५४४. ख्रिस्ताची सेना तारणाची सेने होऊ द्या सिद्ध तीं, ख्रिस्त सेनापती आहे तुम्हां ... १ होऊनियां शूर जैसा तो शिपाई लढे अपुल्या ठायीं राज्यासाठी ... २ दुःखें छळ होती वारंवार ख्रिस्त हा तयार निवाराया ... ३ प्रीतीच्या राज्यात आणा हिंदीजनां जेणें हर्ष मना होई फार ... ४ उभारा तो झेंडा ख्रिस्ताच्या जयाचा, मंजुळ वाणीचा नाद करा ... ५ ---- बा. ल. साळवी