५४५. सार्वभौम ख्रिस्त

मराठी

५४५. सार्वभौम ख्रिस्त धन्य धन्य ख्रिस्त जगत्पती विराजता आज तसा पुढें सदा राजराज तो ... ध्रु गिरीनद ह्या, सार्वभौम भूपतीप्रती वानिती, निधी विजयशब्द नित्य गर्जती, पंगू , दीन, पूर्ण सबल, ख्रिस्तसंगतीं अघजनीता दरीकुहरी तोंड लपवितो ... १ प्रीतिसुधावृष्टिपुष्टी भूप्रदेश तो, निर्मलत्ववायू मंद मंद वाहतो, भावसूर्य नित्य तमा दूर सारितो, संधी दिसे, कलह नसे, हर्ष वाटतो ... २ मृत्युदरी सुगम विगतभीती जाहली ऋद्धी सिद्धी जोडून कर सिद्ध राहिली स्वर्गधरा एकरूपतेस पावलीं जय जय प्रभू येशू ख्रिस्त विश्वपाल तो ... ३ ---- ना. वा. टिळक