मराठी
५४६. ख्रिस्ताचें राज्य
जयजय जयजय प्रभूला जनीं,
गुरु ख्रिस्त हाचि धनी ... ध्रु
वसुंधरा हि त्याच्या प्रतापें
जाईल तै भरुनी ... १
नृपती, राष्ट्रे अर्पूनि दानें,
नमतिल तच्चरणी ... २
रवीसन्मुख कीं नाम तयाचें
राहे सदा अवनीं ... ३
धन्य हो धन्य, म्हणतील राष्ट्रें,
सुख देईं सर्वा मनीं ... ४
आश्चर्यकमें जगती करितो,
वंदा तयाला झणी ... ५
आमेन, आमेन चिरकाल होतो
आरूढ राजासनी ... ६
----- सु. वि. करमरकर