मराठी
५४८. मंडळीचा पाया ख्रिस्त
पाया हा मंडळीचा
प्रभू येशू राणा,
उद्धभव हो तियेचा
शब्दें जलें जाणा
स्वर्गातुनी तो आला
शोधाया नौरितें,
स्वप्राण त्याने दिला,
खंडिली ती रक्तें ... १
तो सर्व राष्ट्रांतूनी
वेंची, तरी ती एक,
विश्वास, जन्म आणि
तियेचा प्रभू एक
ती वंदी नामा एका
एकान्न सेवुनी,
आशेनें चाले एका
सत्कृपा पावुनी ... २
तिरस्कारानें तींतें
मनुष्यें पाहाती,
फुटी, पाखंडे यांतें
कंटाळे भारी ती
तरी सदा सदभक्त
प्रभूला प्रार्थिती
ती शोकरात्र जातां
हर्षेल प्रभातीं ... ३
जगाच्या संग्रामांत
आशेनें राहे ती,
त्र्येकाच्या ती ऐक्यांत
आनंदे वस्ती
गुरु, तू आम्हा नेई
सद्भक्तसंगती
अनंतकाळीं देई
स्वर्गांत विश्रांती ... ४
------------- जे टेलर