मराठी
४८९. मंडळींचे सुरक्षितपण
धन्यता तुझी गे किती,
ईश्वराच्या मंडळी
देवरायें मोठी प्रीती
तुजठायिं ठेविली
स्थिर पाय घातलेला
केविन धक्का पावशीं
तारणाची थोर किल्ला,
वैरियांस हसशी ... १
तुजसाठीं प्रभू धन्य
तो नद्याला वाहवी
पुत्र तुझे आणि कन्या
नित्य यांस पूर्वी
जीवनाचें पीतां पाणी
केवीं लागे हो तहान
जीवन दे प्रभुवाणी
ती नदीही नित्य जाण ... २
लोक रानीं चालतांना
अग्निमेघ दिधला,
प्रेम तैसें दाखवुनी
देव देई तुजला
मार्ग रात्री दाखवाया
तेज पाडी ईश्वरी,
दिवसा तो करी छाया
अवघ्या भक्तांवरी ... ३
--------- एच . बॅलेंटाईन