मराठी
५५०. मंडळीचें सुरक्षितपण
अनंत देवाला स्तवा, स्तवा या,
तो राजा अनुपम थोर
भक्तास सदैवही होई आधार,
हे मंडळी, गा त्यासमोर ... १
पृथ्वीत प्रमोद हि मंडळी जाण,
ती राहे अजिंक्य निर्भय,
तीं आवडीचें हो देवाजीचें स्थान,
तो दावी ती प्रीती अक्षय ... २
भक्तांनी आनंद करावा अपार,
करील कीं ईश्वर न्याय,
नत्यास कल्पांतीही सोडील तो
आलिंगिती जे त्याचे पाय ... ३
जियोनेसभोवतीं घाला हो फेर
कोटाकडे द्या अवधान,
इमारती निरखा, मोजाही घेर
किती हे बुरुज महान ... ४
भक्तांनी म्हणावें, हा देव आश्रय
तो त्यांचा घेईल कैवार,
तयां अंतकाळीं तो ठेवी निर्भय,
स्वर्गातही नेईल पार ... ५
---- एच. बॅलेंटाइन