५५१. शियोनाला आनंदाचा निरोप

मराठी

५५१. शियोनाला आनंदाचा निरोप पर्वताच्या उंच माथां देवदूत गाजवी, मंडळीला हि सुवार्ता तारणाची जाणवी रोदना तूं सोडीं, देव शांतवी ... १ हे तुझे असंख्य वैरी घरिताती तुजला फार वर्षे साह्यकारी कोण नाही भेटला शोक सोडी, देव पाळी तुजला ... २ देव तुला रक्षूनियां सत्वरीच उद्धरी, तो समर्थ येऊनियां सर्व शत्रू घालवी प्रेम साचें देवराय दाखवी ... ३ शांतिसौख्य पावुनियां राहशी सदा निर्भय, देव तुला पाळुनियां, देई तुज अंती जय हर्ष सारा, पूर्ण मुक्तीही अक्षय ... ४ ---- एच. बॅलेंटाइन