मराठी
५५२. मंडळींवरील प्रेम
ख्रिस्ताची मंडळी
हि प्रिय वाटे फार
ती प्रभुणे उद्धरिली
सोसूनी दंडभार ... १
तूं ती संभाळीशी,
हे देवा, सर्वकाळ,
तूं निजलागिं राखीशी,
अत्यंत ममताळ ... २
ती तुझी मंडळी
मी कसा विस्मरेन
त्यापेक्षां सुखें सगळीं
टाकुनी मी मरेन ... ३
ती क्लेशी पाहुनी
देवाला विनवीन,
मी तिजसाठीं खपुनी
आयुष्य घालवीन ... ४
या मंडळीचें नेम
सर्व आवडती,
मोठें तिच्यांत मिळे क्षेम
प्रेमळ सोबती ... ५
हे देवा, मंडळी
तूं वाढवी अपार,
राष्ट्रें तिला दे सगळी,
स्वर्गात पूर्णोद्धार ... ६
---- एच. बॅलेंटाइन