मराठी
५५३. मंडळीच्या वृद्धीसाठीं प्रार्थना
प्रभू , जगाच्या गौरवीं
सामर्थ्या आतां दाखवीं,
तूं मंडळीला सांवरीं,
संपूर्ण राष्ट्रें उद्धरीं ... १
सैतानसत्ता मोडुनी
आरूढ हो राजसनीं
तुझेंच हिंदीस्थान घे,
तूं वश्य करीं अवघे ... २
तूं बोल सर्व ऐकती,
रुक्ष रणेंही फुलती
घालीव गाढ अंधकार
सर्वाना दे, प्रभू उद्धार ... ३
---- एच. बॅलेंटाइन