मराठी
५५४. ख्रिस्तचरित्र
येशूचरित्रास सांगा,
सारें मनीं ठसवा,
गोड सुवृत्त ते सांगा,
उत्सुक मी ऐकवा
गव्हाणी घे जन्म,व्योमीं
गातातीं तै त्याजला,
गौरव मान देवाला,
शांती असो पृथ्वीला ... १
येशूचरित्रास सांगा,
सारें मनीं ठसवा,
गोड सुवृत्त तें सांगा,
उत्सुक मी, ऐकवा ... ध्रु
रानीं कसा तो उपाशी
तेहीं कथा मजला,
भेटती दुष्ट तयासी
मोहिती तैं निश्चला,
कष्टी, श्रमी भागलेला,
लोकीं तरी तो फिरें,
दीन, दरिद्री सदाही,
जागा न त्यास उरे ... २
सांगा कृशी तो दिलेला
साही किती वेदना
कैसा बळी पडलेला
मृत्यूस जिंकी, म्हणा
आहा न ती तुल्य प्रीती,
येई रडे ऐकुनी
ख्रिस्ते मला दिली मुक्ती
प्राण स्वतां अर्पुनी ... ३
----- मेरी ई. बिसल