मराठी
५५५. आरंभापासून चालत आलेली ख्रिस्तवार्ता
सांगा मला ती वार्ता
कीं येशू कृपावान,
जगीं या नीच झाला
सोडूनि सौख्यस्थान
सांगा अशी ती साधी,
कि बाळा समजे,
मी कष्टी, अपराधी,
मला ती आवडे ... १
येशूची प्रीति सांगा
मला ती आवडे ... ध्रु
पाप्यांस खंडुनियां
साधिला जो उद्धार
विस्तारा करुनियां
सांगा तो चमत्कार
चंचल मी मला ती
नाहीं आठवणार,
मनीं ती ठसायाला
सांगा हो वारंवार ... २
पापिष्ट मी, अशाला
हा येशू तारितो,
मला हे प्रेमे सांगा,
मी लक्ष लावितो
दुःखित असताना
निराश होतो मी
मना आधारा द्याया,
ती सांगा नेहमीं ... ३
कितीं कधीं जगाची
हि इष्ट दिसती
तैं सांगा येशूप्रीति,
ती तृप्ती करिती
स्वर्गास पुढें जाया
जगाला सोडणार,
ती सांगा धीरा द्याया,
तेणें मी तरणार ... ४
- ---- मेरी ई. बिसल