५५६. प्रभुप्रेमाचे पुनःकथन

मराठी

५५६. प्रभुप्रेमाचे पुनःकथन येशुची प्रीती वर्णिती, त्रिभूवनात वानिती, सदा नवीन वाटती, ती मला हि वदावि ... १ प्रीती प्रभूची गावी, त्याचिं कृत्ये वर्णावी मजवरीही प्रीती करी, पुनः पुन्हा वदावि ... ध्रु सुखें जगिक संपती, रविसी मेघ झाकीती, जगाची आस खुंटती, येशूप्रीती वदावि ... २ जगांत दुःख घेरितें, विश्वास, भाव हारितें, पहिली शांती लोपते, येशूप्रीती वदावी ... ३ सुरम्य दिव्य नगरी मी भ्रष्ट पोंचलों जरी म्हणेन तेग तैं तरी येशूप्रीती वदावी ... ४ ---- मेरी ई. बिसल