मराठी
५५७. ख्रिस्ताची श्रेष्ठ प्रीती
ख्रिस्ताची थोर प्रीती
सांगेन तुजला,
तो दीन झाला किती,
तो केवीं वतेला
सांगेन कि ती साची,
ती गोड वर्णाया
हि गोष्ट तारणाची
विचारें पापियां ... १
हि ख्रिस्तप्रीती गावी,
सर्वास कळवावी,
स्वर्गातही वर्णावि,
हें फार आवडे ... ध्रु
ख्रिस्ताची थोर प्रीती
अपूर्व ती अपार,
गाईन त्याची स्तुती,
कधीं न राहणार
मला अश्या पाप्याला
ख्रिस्ताने शोधिलें
किती हो कळवळा
अशास तारिले ... २
ख्रिस्ताची थोर प्रीती
सांगेन सर्वा ती,
ती हर्ष देते मला,
रसिक वाटे ती
आहां बहुतेकांला
हीं नाही कळली,
सांगावीं त्यां, हि मला
उत्कंठा लागली ... ३
ख्रिस्ताची थोर प्रीती
जयांस कळली
ते पुन्हा इच्छिताती
ऐकाया सगळी
स्वर्गात जाऊं आम्ही
नवीन गायने
होतील तीं नेहमी
ख्रिस्तांची स्तवने ... ४
---- मेरी ई. बिसल