५५८. शुभवर्तमानाचा प्रसार

मराठी

५५८. शुभवर्तमानाचा प्रसार येशूला वंदिताना उभारा हो निशाण, गर्जुनीयां होसान्ना सांगा सुवर्तमान येवोत सारीं राष्ट्रें, येवोत पातकी, घेवोत ते उद्धार रांगोत सत्सुखी ... १ वंदा येशूला, उभारा हो निशाण, गर्जुनीयां होसान्ना सांगा हो, सांगा सुवर्तमान ... ध्रु हे प्रभू तारणाऱ्या तूं राज्य चालवीं, अंधारीं राहणाऱ्या वेगें प्रकाशवी सर्वत्र सुज्ञानाची प्रतीक्षा करिती, सर्वत्र तारकाची सत्कृपा वर्णिती ... २ ------- एच. बॅलेंटाईन