५५९. शुभवृत्त सर्वत्र सांगणें

मराठी

५५९. शुभवृत्त सर्वत्र सांगणें जगिं दुर्दशा कैशी अज्ञान केवढें अयोग्य रीती कैशा चालू चोहोंकडे पृथ्वीच्या सर्व भागी कुमार्गी चालती, सर्वत्र धर्मत्यागी द्या ज्ञान त्यांप्रती ... १ पाहा, देवाने केले अनंत उपकार सर्वत्र पुरविले जगिं सौंदर्य फार तो दे जरी सुदानें व्यर्थचिं ती होतीं कि कोणी अंधत्वाने मूर्तिंतें पूजिती ... २ आम्हालां शास्त्रदिवा देवाने दिधला दिगंतरी तो न्यावा, सर्वाना योजिला सर्वत्र गाजवुनी वर्णा उध्दारक्षेम, राष्ट्रांना कळवुनी स्तवा हे ख्रिस्तप्रेम ... ३ जा हो सुवार्तिकांनो सुवार्ता गाजवा समुद्रवार्यांनो वेगाने पोंचवा येशू जगाचा राजा करो सर्वाधिकार, पृथ्वीच्या साऱ्या प्रजा पावोत पूर्णोद्धार .... ४ ---- एच. बॅलेंटाईन