५६०. वचनाची पूर्ती करणारा दैवी आत्मा

मराठी

५६०. वचनाची पूर्ती करणारा दैवी आत्मा हे सदात्म्या, तूं समर्थ पापी लोकां वळवी शास्त्रबोध जाई व्यर्थ, तूं सामर्थ्ये ठसवि हे समर्था, हे समर्था, सद्धभारला वाढवी ... १ नेमलेली वेळ यावी, आतां प्रभा फांकों फार, मानवाला ती दिसावी अधर्म्यांना दे उद्धार हे सदात्म्या वचनाच्या, तूं निवारी अंधकार ... २ तुझें शास्त्र सर्व सत्य, सत्य तुझें बोलणे, आता येई तूं अगत्य, पूर्ण करी वचने हे सदात्म्या सत्यवादी, पाडी तुझी किरणें ... ३ ---- एच. बॅलेंटाईन _________________________________________________________________________ ५६१. शुभवर्तमानाचा प्रसार हे लोक, देवा, सगळे तुझ्या हाताचे काम, सृष्टींमध्ये प्रगटले तुझें सुवंद्य नाम तुझी अत्कर्य प्रीती ती शास्त्री प्रगटती, ती प्रीती मानवाप्रती कल्याण अर्पिती ... १ सर्वत्र हे सुवर्तमान केव्हा हो कळणार प्रत्येक जना शास्त्रज्ञान केव्हां समजणार पीडित दासां सत्वरी सच्छास्त्र कळवी, पापातुनी त्या सोडवीं, स्वप्रजा म्हणावीं ... २ जे अज्ञ दे तयांस ज्ञान, सारीं त्यांच्या भ्रमा, देवोत ते प्रभुसि मान, स्तवोत ते प्रेमा प्रभू, तूं आत्मा वर्षूनी भक्ता साह्य करी, पापाची सत्ता मोडुनी तूं हो सत्ताधारी ... ३ ---- एच. बॅलेंटाईन _________________________________________________________________________ ५६२. ख्रिस्ताचे साम्राज्य हे देवा, तूं सामर्थ्यवान, स्वयंभू सर्वशक्तिमान येशूला दे सर्वाधिकार, जगाचा राज्यकारभार ... १ येशूला राज्य शोभतें, आनंदे स्वर्ग मनीतें, दीनाचा न्याय तो करी, दुर्जना बुडवी परी ... २ भक्ता सप्रेम तारितो, द्रोह्या बळाने मारितो, सूर्यचंद्राचा होई क्षय तोवरी येशू पावे जय ... ३ येऊनि वृष्टीसारिखा अर्पी प्रसाद सेवकां, प्रेरणा देई अंतरी जैसा वर्षाव डोंगरी ... ४ तो देउनी प्रकाश फार राष्ट्रांचा घालावी अंधार, तेणें सर्वत्र हर्षति, शुष्क अरण्ये फुलती ... ५ संत स्तसौख्य पावती, शोभेचें वस्त्र घालिती, सर्वांचे होई सत्कल्याण, अनंत हर्ष, समाधान ... ६ ---- एच. बॅलेंटाईन _________________________________________________________________________ ५६३. प्रेषितांस आज्ञा आज्ञा येशूने दिधली जा, गाजवा सुवर्तमान, पाप्यांचा मी उद्धारिता, संतांचे मी सदा कल्याण ... १ मी स्वकरीं, सत्ता धरीं, स्वजन रक्षीं चिरकाळ, हें जग जाईपावेतो संगती राहे सर्वकाळ ... २ आज्ञा शिष्यांस दिधली, संतांनो, या, करा त्वरा, सर्वत्र धावुनी म्हणा, येशूकडेस या, तरा ... ३ ---- एच. बॅलेंटाईन