मराठी
५६४. ख्रिस्ती सुवार्तिक
जे सांगती उद्धार,
सत्कृपा ईश्वरी,
तयांचे पाय रम्य फार
शियोन डोंगरी ... १
सुवृत्त सांगतां
मंजुळ त्यांचे स्वर,
येशू समर्थ तारिता
आहेच खालीवर ... २
आम्हीही ऐकुनी
खरे सुभाग्यवान
नृप मिळे न ऐकण्या
तै तें अतृप्त जण ... ३
प्रसंगें या आम्हा
हें तेज दिसले
नृपांनीं ते पाहाव्या
अत्यंत इच्छिले ... ४
जे पाहरेकरी
शीयोन राखिती
ते गाती ईश्वरी कृपा,
ते ख्रिस्त वंदिति ... ५
सर्वत्र भाग्यवान
सुराज्य चालवी,
नमा ख्रिस्ता, स्तवा तया
स्तोत्रें हि गा नवीं ... ६
---- एच. बॅलेंटाईन