५६६. सुवार्तिकाची प्रार्थना

मराठी

५६६. सुवार्तिकाची प्रार्थना ख्रिस्ता, हें जग तूं वश्य करीं राष्ट्रांस जिंकाया ये सत्वरी संपूर्ण सर्वस्वी तूं सत्ता चालवीं तूं चालवी ... १ नाहीसा कराया पापांधकार सद्भक्त सांगती जगदुद्धार राष्ट्रांस वळवी हे ख्रिस्त गौरवी, तूं वळवीं ... २ सर्वत्र नमती तुजसमोर, हि आशा मंडळी बाळगी फार पृथ्वीसीमा येवो, ख्रिस्त तुला स्तवो वश्य होवो ... ३ हो नेतां तू आम्हा तूं राजा थोर ह्या भक्तसैन्यासी जिंकीते कर घे वतन पृथ्वी हो राजा वैभवी, तूं वैभवी ... ४ हे ख्रिस्तसैनिका, तूं धरीं धीर, संपेल तोंवरी हो युद्धि स्थिर, हे जगज्जीवना, हि ऐक प्रार्थना, तार जना, सर्व जना ... ५ ----- मेरी ई. बिसल