मराठी
५६७. शुभवृत्तप्रसार करण्याबद्दल आग्रह
हे शियोना, तूं आपल्या त्या कार्या
वेगें लागें, जा सांगे सर्वाला,
कि ह्या जगा जयाने निर्मियेले
त्या पहावेना आत्मा मेलेका ... १
शांतीच्या वृत्ता जा, जा, सांगा
सांगा येशूच्या, त्या मुक्तीच्या कथा ... ध्रु
जा, सांगा जा कीं, विश्वाचा निर्मिता
तेजोरूपी आहे, जाणा त्याला
कोणी निशाच्छायेमाजी पाहतां,
साहेना तें त्या प्रेमाबुधीला ... २
पाहा लोकीं लाखों पापाच्या दास्यी,
अंधारीं बंदीमाजी राहाती
कोणी नसे सांगावयाला त्यांशी
कि ऐशाना येशू देई मुक्ती ... ३
ज्यासाठी येशू अर्पी स्वप्राणातें
पावावा नाश त्या आत्म्यांनी कां
त्यांना जपा, हो सोडा आलंस्थातें,
जा आणा जा, त्या रत्ना एकेका ... ४
तो राजा ये त्यापूर्वी, हे शियोना,
भेटाया त्या नुरो कोना भीती
दोषी न हो, आणि साऱ्या आत्म्यांना
जाणों दे सर्वा येशूची प्रीती ... ५
----------- ना. वा. टिळक