५६८. ख्रिस्ती मनुष्याचे युद्ध

मराठी

५६८. ख्रिस्ती मनुष्याचे युद्ध सैनिकांनो, धैर्य धरा, युद्ध राहा स्थिर, पाहा पुढें चालणारा ख्रिस्त महावीर ... १ जयजयकार करा, यश मिळते, साह्यकारी प्रभु ख्रिस्त आम्हां संगातें ... ध्रु सर्वदा असंख्य वैरी हल्ला करिती, बाण येति आम्हावरी, शूर पडती ... २ तो वैर्यांचा सरदार साच बलवान, ख्रिस्त परी तारणार, कैवारी महान ... ३ सैनिकांनो, कां दबावे झुंजा त्यांजशीं, शेवटास युद्ध न्यावें, मीळा ख्रिस्ताशी ... ४ ------- मेरी ई. बिसल