मराठी
५६९. ख्रिस्तसैनिकास आव्हान
पाहा क्रूसझेंडा पुढे चालला,
ख्रिस्ती सैनिकांनो चला हो चला
सरदार ख्रिस्त पुढें असतां
वैऱ्यांमध्ये गेला त्याचा बावटा ... १
पाहा क्रूसझेंडा पुढे चालला,
ख्रिस्ती सैनिकांनो चला हो चला ... ध्रु
जयध्वजामुळे धाक वाटतो
सैतानाचा मेळा पळू लागतो
घोष ऐकुनिया दुष्ट कापतों
करा हो आरोळी, जय मिळतो ... २
थोर फौजिरूपी ख्रिस्ती मंडळी
शत्रू जिंकायाला झुंजू लागली,
एक प्रभू आहे, बंधू हो आम्ही,
ऐक्यता असावी, मेळ नेहमी ... ३
गळताति राज्ये पिकल्यावरी,
वाढे ख्रिस्तसत्ता सर्वदा तरी
बळ नरकाचें नची चालते
वचन ख्रिस्ताचे ठाम राहते ... ४
तर सैनिकांनो, व्हा पुढें, चला,
आमुच्या सांगातें लागा गायाला
संतानो, दूतांनो, त्या सर्वोत्तमा
सुवंदित म्हणा, वंदा महिमा ... ५
------- एस. बी. फेअरबँक