५७०. सुवार्तिकांस उत्तेजन

मराठी

५७०. सुवार्तिकांस उत्तेजन ख्रिस्ती भक्तांनो, शूर व्हा, जाउनी वार्ता गाजवा, लोकांचा घालवा अंधार, सर्वत्र कळवा उद्धार ... १ प्रभू करील प्रतिपाळ, होईल तुम्हा नित्य ढाल, प्रचंड वायू शमवि, क्षुब्ध समुद्र शांतवी ... २ समाप्त होई सर्व काम तैं वर्ते गाऊं ख्रिस्तनाम. तेथें पडू ख्रिस्तासमोर मिळुनी वानू कृपा थोर ... ३ ------ एच. बॅलेंटाईन